ठाकरेंसोबत २५ वर्षे राहून त्यांच्यावरच वैयक्तिक हल्ले; सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा

Supriya Sule Maharashtra Today

मुंबई :- परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलेल्या पत्राचे पडसाद आज संसदेतही पाहायला मिळाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपावर निशाणा साधला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सभागृहात मांडलेल्या विमा संशोधन विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. विधेयकावर बोलण्यापूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”शून्य प्रहरात महाराष्ट्रातील मुद्द्यावर आठ लोकांनी भूमिका मांडली. पण आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की, हे दोन पक्ष कधीही वेलमध्ये येत नाहीत. जर आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत, तर आम्हाला बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. आमचा आवाज दाबला जाऊ नये. हे सरकार यू-टर्न सरकार आहे. आज मला याचं  आश्चर्य वाटतंय की, २५ वर्षे  शिवसेनेसोबत संबंध होते. तरीही उद्धव ठाकरेंवर कशा पद्धतीने वैयक्तिक हल्ले केले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER