
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे. आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर ठाकरे सरकारमधील एकाही महिला नेत्यानी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून टीका होत होती. मात्र अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबदमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या प्रकरणात इतके ट्विस्ट येत आहेत त्यामुळे खरं काय आणि खोटं काय?, हा विषय अतिशय संवोदनशील आहे त्यामुळे मला वाटतं या प्रकरणावर बोलताना सर्वांनी जबाबदारीने बोलायला हवं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
कुठलाही आरोप कोणावर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आरोप कोणत्या व्यक्तिवर होत नाही तर संपुर्ण कुटूंबावर होत असतो. त्या कुटंबात त्यांची मुलंही आहेत. त्यामुळे हे विषय गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे हाताळावेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला