इंदुरीकर महाराजांवर सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई :  गर्भलिंग चाचणीसंदर्भात कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे . यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला . इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं म्हणत खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशाप्रकराची अंधश्रद्धा पसरवली जाणं हे दुर्दैवी आहे. किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या .

लालसगाव पीडितेची प्रकृती चिंताजनक! उपचारासाठी मुंबईत हलवले

राज्यातील वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न असून फक्त कायदे कडक करून हा प्रश्न सुटणार नाही, तर समाजात प्रबोधन करण्याची गरज असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. घरगुती अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या.