आता पाहुया, अजित दादा पवार यांच्याविषयीची महत्त्वाची बातमी; सुप्रिया सुळे बनल्या न्यूज अँकर

Supriya Sule

जळगाव :- खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेकदा बातमीदार, फिल्ड रिपोर्टर, न्यूज अँकर यांच्याविषयीची काळजी कुतुहलदेखील त्या करताना पाहिलं आहे. आज त्यांनी चक्क न्यूज रूममधून न्यूज अँकरची भूमिका निभावली. न्यूज अँकर बनत न्यूज स्टुडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी (Supriya Sule news anchor) दिली. जळगाव दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील मास मीडिया विभागाला भेट दिली. या भेटीत त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील कामाचे विविध पैलू जाणून घेतले.

“देशाचे पंतप्रधानदेखील स्वत: ओबीसी आहेत”, भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचे उत्तर

सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लँग्वेज’ विभागाला भेट देत स्टुडिओची रचना समजून घेतली. तसेच न्यूज अँकर म्हणून बातमी दिली. विशेष म्हणजे न्यूज अँकर म्हणून बातमी देताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी वाचली.

याशिवाय त्यांनी न्यूज अँकर टेलिप्रॉम्प्टरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा, असे मुद्दे जाणून घेतले. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांशी निगडित शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली.

दरम्यान, जळगाव दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच जळगावमधील अनेक समस्या जाणून घेतल्या.

सौजन्य : TV9


Web Title : Supriya Sule becomes a news anchor

(Maharashtra Today : Online Marathi News Portal, Latest and breaking maharashtra News Headlines in marathi on Maharashtra Today)