सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांची माफी मागावी

Supriya Sule

मुंबई :- सातारा (Satara) जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या (NCP) “त्या पावसाच्या भरसभेत एकही मिडिया प्रतिनिधी उपस्थित नव्हता.” असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले होते. सुळे यांच्या वक्तव्याचा साताऱ्यातील प्रसारमाध्यमांनी निषेध केला. सुप्रिया सुळेंनी सातारा येथील प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी साताऱ्यात भरपावसात भाषण केलं होतं. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी केलेल्या भाषणात, शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी सोडून भाजपात (BJP) गेलेल्या उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता.

ही बातमी पण वाचा : …तर अशा ट्रकभर एसआयटी लावाव्या लागतील, जाऊ द्या ना ताई; आशिष शेलारांचा  सुप्रिया सुळेंवर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER