
मुंबई :- गेल्या ३० दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
सुळे यांनी लालबाग येथील इंडिया युनायटेड मिल नंबर-5 मधील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या .
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.
यावरून केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही, असे सुप्रिया म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : राजा ‘उधार’ झाला अन् हाती भोपाळ दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला