देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंचे खडेबोल

Supriya Sule

मुंबई : देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारला (PM Modi) खडेबोल सुनावले आहे . ही घटना दुर्देवी असून त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी असून योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकाराबद्दल स्वत:ची चूक कबूल करावी, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेवरून योगी आदित्यनाथ सरकारला सुनावलं आहे.

हाथरस येथील घटना अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन्ही बलात्काराच्या घटना हे योगी सरकारचं अपयश आहे. त्याची जाणीव योगी सरकारला व्हायला हवी. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER