सुप्रिया सुळेंसमोर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर आद्यपही कारवाई नाही

NCP-Local Leader Fight

औरंगाबाद : गेल्या महिन्यात मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ पाहायला मिळाला होता. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पैठण येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात माजी आमदार संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. हा सगळा गोंधळ सुप्रिया यांच्यासमोरच झाला होता. त्यांनतर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षातर्फे कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अद्यापही या कार्यकर्त्यांवर कोणतेही कारवाई झालेली नसल्याने, राष्ट्रवादी पक्षाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं बोलले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन नेत्यांचे कार्यकर्ते सभा सुरु असतानाच एकमेकांमध्ये भिडले होते. स्थानिक राजकारण आणि वर्चस्वाच्या भावनेतून हा वाद उफाळल्याचं बोलले जात होते. त्यांनतर संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरला होता. मात्र अशा गोंधळी कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागच्या महिन्यात पैठण येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळेंसमोर पक्षातील गटबाजी समोर आली होती. संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला होता. त्यामुळे संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेतला. आता फक्त मी बोलणार, असं सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून कष्टानं उभा केला आहे. याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवावं. तुमचा मान, आदर मी करतेच. तुमच्या भावनाही समजू शकते. पण, गालबोट लावणाऱ्याला मी माफ करणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे, तुमच्या लक्षात आहे. गाठ माझ्याशी आहे. माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला आहे. ही बैठक माझ्यासाठी आठवणीत राहिलं,” असा दम देत त्यांनी अर्ध्यावरच हा कार्यकर्ता मेळावा संपल्यांची घोषणा केली आणि निघून गेल्या होत्या.