सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स काढावी, हा किळसवाणा प्रकार : सुप्रिया सुळेंचा संताप

Sushant Singh Rajput - Supriya Sule

मुंबई : सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक (Facebook) अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याविषयी संताप व्यक्त केला .एखाद्याच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंटस काढण्यात आली आणि एका पक्षाने त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हे चित्रच निव्वळ धक्कादायक आणि किळसवाणं असल्याचे त्या म्हणाल्या .

तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल. पण असं कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार आहे. आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर गेलीये, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे , असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रातला सध्याचा क्राईम डेटा गृहमंत्र्यांनी आणि त्यांच्या दोन्ही राज्यमंत्र्यांनी आम्हा सर्वपक्षीय नेत्यांपुढे मांडला आहे. आम्ही गृहमंत्र्यांना विनंती केलीये की हा डेटो मीडियाला देखील द्यावा जेणेकरुन तो लोकांसमोर येईल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान हाथरसप्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला तसंच पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभं केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER