पार्थ पवारांचे ‘जय श्री राम’; लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार – सुप्रिया सुळे

Supriya Sule on Parth Pawar

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पत्राद्वारे राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Parth Pawar letter on Ram Mandir Ayodhya).

हिंदू विचारसरणी विरोधात पक्षाची भूमिका माडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू व त्याच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवाने अशी भूमिका घ्यावी याचे अनेकांनी आश्चर्य व्यकते केले आहे तसेच, राजकीय वर्तुळातही पार्थ पवारांचे जय श्री राम विशेष चर्चेचा विषय बनत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या पार्थ पवारांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांनी जय श्री राम म्हणून असे पत्र लिहीणे किंवा राममंदिराप्रती त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. हे पक्षाचे मत नाही. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला आपले वैयक्तिक मत, भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

पार्थ पवार मागिल वर्षी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधून ऊभे होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव पाहावा लागला. त्यानंतर शांत असलेले पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे. पार्थ पवार यांनी नुकतीच सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणातही उडी घेतली आणि महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सुरात सूर मिसळत सुशांतसिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

त्यानंतर आता पार्थ यांनी जय श्री रामचा नारा दिला आहे. पत्राची सुरूवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. “अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,” असं मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असं आवाहनही पार्थ पवार यांनी पत्रातून नागरिकांना केले आहे.

दरम्यान, राजकीय जाणकारांच्या मते पार्थ पवार यांचा जय श्री राम वैयक्तिक मत असले तरी वारंवार पक्षाच्या विरुद्ध विचारांशी सहमती देणे किंवा मत व्यक्त करणे म्हणजे निश्चितीच पक्षाच्या विरुद्ध भूमिका गेणे असे म्हणता येईल असे म्हटले आहे.

तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना लावध भूमिका घेतली आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा पार्थ यांचे पिता राज्य़ाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पार्थ यांनी लिहीलेले पत्र आम्ही येथे देत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER