आपली मुंबई सुरक्षितच आहे : सुप्रिया सुळे

मुंबई:  ‘आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट.’ असं लिहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पावसात उभ्या असणाऱ्या पोलिसाचा फोटो ट्विट केला आहे.


बॉलिवूड अभिनेता सुशातसिंग  राजपूतच्या मृत्युप्रकरणाची  (Sushat Singh Rajput,sucide case)  चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री क्वारंटाईन करण्यात आले होते .यावरून विरोधकांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित केली. भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

“सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही.” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या वादात उडी घेतल्याचे दिसते. सुळे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लागवल्याचे त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER