सुप्रिया सुळेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट ; चर्चेला उधाण

Supriya Sule - Maharashtra Today

मुंबई :- राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का झाली याचे कारण अस्पष्ट असले तरी सुप्रिया सुळे यांनी चर्चेसाठी भेट घेतल्याचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेतली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पवारांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भेट घेतली होती. त्यामुळे आता खडसे आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button