निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंना डासांचा फटका, डेंग्यूमुळे विश्रांती घेण्याची वेळ!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, याच काळात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारांच्या प्रचार कार्याला ब्रेक लावावा लागलेला आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर याबाबत माहिती दिली. प्रचारात सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी सज्ज असताना डेंग्यूची लागण झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : ‘लक्षात असूद्या, आपला गडी लई भारी आहे,’ पवारांवर झालेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला! मला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.”