डेकोरेटर व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करणार मागणी

CM Thackeray-Supriya Sule

मुंबई :- जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक यानंतर आता डेकोरेटर्स व्यावसायिकांसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सरसावल्या आहेत . डेकोरेटर्स व्यावसायिकांवर छोटे उद्योजक आणि मजूर अवलंबून आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचे काम सुरू करावे,  अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) केली आहे.

जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक यानतंर आता डेकोरेटर्स व्यावसायिकांसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सरसावल्या आहेत . डेकोरेटर्स व्यावसायिकांवर छोटे उद्योजक आणि मजूर अवलंबून आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचे काम सुरु करावे,” अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) केली आहे.

मुंबई (नॉर्थ-ईस्ट) डेकोरेटर्स अँड सप्लायर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आज (७ ऑक्टोबर) सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी  विविध मागण्याचे निवेदन सुळे यांना  दिले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलेले आहे.

राज्यातील मंडप डेकोरेटर्स, केटरर्स व इव्हेंट ऑर्गनायझर्स यांचा व्यवसाय या कोरोनाच्या काळात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा उद्योगाचा दर्जा त्यांना देण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER