बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे : सुप्रिया सुळे

Supriya Sule

जिंतूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले . गेल्या अनेक वर्षे एका विचाराने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या नेत्यांची मुले आपल्या सत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्यांच्या दारात मुजरा करायला लावत आहेत. असे वंशाचे दिवे काय कामाचे? अशी घणाघाती टिका सुळे यांनी केली आहे .

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरलाय – सुजय विखे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नऊ सप्टेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर आहे. मंगळवारी संवाद यात्रेनिमित्त जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यावर सडकून टीका केली आहे .

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणी, गाठीभेटी, राजकीय दौरे यासारख्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे . सुप्रिया सुळे या सुद्धा चांगलेच सक्रीय होताना दिसत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : ‘दोन वेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला’