मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Supriay Sule - PM Narendra Modi

अंबरनाथ : मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली . ‘मन की बात‘ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे.काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला.

कोव्हिड काळात खासदारांचा 12 कोटींचा निधी कापला. आम्ही कोव्हिड काळ असल्याने मान्यही केले. मात्र, मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरु केले. तोच निधी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता, तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना का हा उपद्व्याप असा सवाल करतानाच हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

अंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे कारण हे रस्ते आमचे सरकार असताना झाले आहेत. याअगोदर या देशात काहीच झालं नाही की कसली उभारणी झाली नाही जी सहा वर्षांत झाली असे केंद्र सरकार सांगत आहे. अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER