
देशातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवार यांनी आज वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत राजकारणाच्याबरोबरीने कला, क्रीडा असा सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचा वावर राहिला आहे. त्यामुळे आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना राजकीय तसेच अन्य क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील वडिलांसोबत एक सुंदर फोटो पोस्ट करुन, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय @PawarSpeaks साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/ocDYap9Jka
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला