सुप्रिया सुळेंना सलग सहाव्यांदा ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर

Supriya Sule Maharastra Today

बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शनिवारी (२० मार्च रोजी) प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

वर्तमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा त्यांना जाहीर झालेला ‘संसदरत्न पुरस्कार’ ही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला, असे फाउंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळवले आहे. सोळाव्या लोकसभेत सुळे यांची सभागृहात ९६ टक्के उपस्थिती होती. त्यांनी १५२ चर्चासत्रांत भाग घेतला.

एकूण ११८६ प्रश्न विचारलेत व २२ खासगी विधेयके मांडली. सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांची उपस्थिती ८९ टक्के आहे. १२२ चर्चासत्रांत भाग त्यांनी घेतला आहे. सभागृहात २८६ प्रश्न विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER