केंद्रसरकार बेरोजगारी,अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलणे टाळते; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक

Supriya Sule.jpg

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.

मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या (unemployment-economy) समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे म्हणत म्हणत सभागृहात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session Parliament) पहिल्याच दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. त्यातच या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच, पावसाळा अधिवेसऩात प्रश्नोत्तराचा तास वगळळ्याने लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रश्नोत्तराचा तास वगळला. मात्र, प्रश्नोत्तराचा तास हा सुवर्ण अवधी असतो. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका अधिर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER