मराठा आरक्षणावर उद्या ‘सर्वोच्च’ निकाल

Maratha Reservation - Supreme Court - Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) १९९२ ला ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) १५ ते २६ मार्च दरम्यान सुनावणी झाली. १०२ वी घटनादुरुस्ती राज्यांचे अधिकार नाकारत नाही, असे केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button