‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगडं मारु नयेत’, सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांना झटका

Supreme Court-Parambir Singh

नवी दिल्ली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मोठा धक्का बसला आहे. आज सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच याचिकाही फेटाळली.

सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे. तुम्ही ३० वर्षांपासून महाराष्ट्राच्या पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये, अशी तंबी देत तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांनी मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला. तरी देखील सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली. तुम्हाला फौजदारी कायद्याचे सखोल ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती का द्यावी? आम्ही सर्व एफआयरबद्दल बोलत नाही. एफआयरासाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावे, असे कोर्टानं स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button