पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी; ममता सरकारला फटकारले

Mamata Banerjee - Supreme Court

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणी राज्य सरकारला चांगलेच सुनावत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर होत असलेल्या पलायनासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवर सुनावणी झाली. न्या. विनीत शरण आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने या प्रकरणी मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पक्षकार करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच, पश्चिम बंगाल सरकारने कथित पलायन थांबवावे आणि या हिंसाचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

निवडणूक निकालानंतर मोठा हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठा हिंसाचार झाला आहे. नंदीग्राम येथील भाजपाच्या (BJP) कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच अन्य नागरिकांनी पश्चिम बंगालमधून पलायन केले आहे.

पोलिसांकडून योग्य तपास नाही
या हिंसाचारानंतर अनेकांनी सामूहिक पलायन केले. अनेकांनी स्थलांतर केले. पोलीस आणि राज्य प्रायोजित गुंड यांची मिलिभगत आहे. त्यामुळे पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही. सुरक्षा पुरवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका असून, आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी स्थलांतर केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button