बिहारची निवडणूक पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Supreme Court

दिल्ली : करोनाच्यासाथीमुळे (Corona) बिहार (Bihar) विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला. बिहार करोनामुक्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी मागणी करणारी याचिका फेटाळली.

याचिका फेटाळताना न्यायाधीश अशोक भूषण म्हणाले की, निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोविड आधार असू शकत नाही. अद्याप निवडणुकीची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही याचिका गैरसमजातून करण्यात आली असून ती दाखल करुन घेता येणार नाही.

न्याआधीश एम. आर. शाह म्हणाले – निवडणूक आयोग प्रत्येक गोष्टीची दखल घेत सर्व काळजी घेईल. ते याबाबत काळजी घेणार नाही, असे तुम्हाला का वाटते ? असे न्यायाधीशांनी याचिकाकर्ता अविनाश यांना विचारले. अविनाश ठाकूर यांनी ही याचिका केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER