मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Maratha reservation.jpg

मुंबई :- मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने (SC) नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार ही लढाई सुरूच आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे. त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल, असं या घटनापीठनं म्हटलं आहे. आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही, असं कोर्टानं  म्हटलं आहे.

मात्र या ॲक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही, असं कोर्टानं  म्हटलं आहे. ठाकरे सरकारची बाजू मांडणारे मुकुल रहतोगी यांनी विद्यार्थ्यांंचं किती नुकसान होईल, नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुप्रीम कोर्टानं  हे उत्तर दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं  मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं होतं. आज आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवली जाईल, असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती कायम ठेवली आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा… मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER