हायकोर्टाची चूक झाल्याच म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव गोस्वामीला जामीन मंजूर

Arnab Goswami-SC

नवी दिल्ली : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांची ५० हजारांच्या हमीवर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. अंतरिम जामीनसाठी अर्णव गोस्वामींचा अर्ज नामंजूर करणं ही मुंबई हायकोर्टाची चूक होती, असे मत सर्वोच्च न्यायालयानं यावेळी नोंदवले हे विशेष.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींना जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. हरीश साळवेंनी युक्तिवाद करताना “अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करुन आत्महत्या केली”, असा आरोप केला. हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींविरुद्ध सूड भावनेने कारवाई होत असल्याचेही न्यायालयात सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या चर्चेचा आणि इतर प्रकरणांचा दाखला साळवेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER