मिर्झापूर निर्मात्यासह अमेझॉन प्राईम व्हिडिओला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Amazon Prime-Supreme Court

नवी दिल्ली :- अ‌ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ वेब सीरीजवरील वाद थांबत नाही. तोपर्यंत अ‌ॅमेझॉन प्राईम प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘मिर्झापूर’ वेब सीरिजवरील आरोपांची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. मिर्झापूर निर्मात्यासह अ‌ॅमेझॉन प्राईम व्हिडिओला नोटीस बजावली आहे.

ओटीटी प्लेटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिकांसोबत सदर याचिकेची सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. मिर्जापूर शहराचे नाव खराब केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केलेला आहे. तर अन्य एका याचिकाकर्त्याने आपले निवासस्थान मिर्झापूर असल्याचे सांगितल्यामुळे दुसऱ्या राज्यात नोकरी मिळाली नसल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील नागरिक अरविंद चतुर्वेदी यांनी ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या निर्मात्याविरोधात गुन्हाही दाखल केलेला आहे. वेब सीरिजमध्ये ‘मिर्झापूर’ ला चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले असून यामुळे धार्मिक, प्रादेशिक तसेच सामाजिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER