सर्वोच्च न्यायालयाचा अवमान : प्रशांत भूषण यांना एक रुपया दंड

prasant bhusan-SC

दिल्ली : न्यायालय अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (SC) एक रुपयाचा दंड ठोठावला. दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरायचा आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागले व तीन वर्ष प्रॅक्टिस करता येणार नाही. न्यायाधीश अरुण मिश्रा (Arun Mishra) यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली. प्रशांत भूषण यांना १४ ऑगस्टला दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूरमधील (Nagpur)राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्विट करून त्यावर टीका केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस बजावली होती. तसेच सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट त्यांनी केले होते. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.

या ट्विटमुळे लोकशाहीचे खांब कमकुवत होत असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले होते. १४ ऑगस्ट रोजी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. यावर भूषण यांनी, न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे निवेदन न्यायालयात केले होते. या विधानाचा फेरविचार करा अशी सूचना न्यायालयाने केली होती.

माफी न मागण्यावर ठाम

न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रशांत भूषण यांनी २५ ऑगस्टला निवेदन सादर केले – “मी माफी मागणे ढोंगीपणाचे ठरेल. माझ्या विधानांना मी नाकारले व माफीनामा सादर केला तर स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा करणे असेल. मी केलेली विधाने सद्हेतूने केली होती. सर्वोच्च न्यायालय किवा सरन्यायाधीशांचा अपमान करण्यासाठी ही विधाने केली नव्हती. न्यायालये लोकांचे हक्क आणि घटनेचे रक्षण करणारी असतात. ती त्यांच्या या प्रमुख भूमिकेपासून दूर जात असल्याबद्दलची ती रचनात्मक टीका होती,” असे भूषण म्हणाले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER