ठाकरे सरकारची प्रतिष्ठा पणाला; मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Maratha-Reservation-Supreme Court

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत आज (7 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामधील आरक्षणाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यावेळी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबतही सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सुनावणीची तारीख जाहीर झाल्यापासूनच मराठा आरक्षणासाठी आपला जीव पणाला लावणारे मराठ्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काहीही झाले तरी आरक्षणाला धक्का लागू नये. आरक्षणाचे बरेवाईट होऊ नये अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात पास होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुरेपूर प्रयत्न करायला हवे असे मराठा कार्यकर्त्यांनी म्हटले होते. आज त्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झालं आहे. हे आरक्षण टिकले पाहिले ही सरकारची भूमिका आहे. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अधिक तयारीनिशी जाण्याचं आवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER