मराठा आरक्षणाबाबत सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून तारखा निश्चित

Maratha reservation.jpg

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात (SC) मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी ८ मार्च ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या आहेत. याचिकाकत्त्यांना युक्तिवादासाठी ८, ९, आणि १० मार्च रोजी वेळ दिला आहे. तर १२, १५, १६ आणि १७ मार्च रोजी राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. १८ मार्चला केंद्राच्या वतीने अॅटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत. यामुळे ८ मार्चला अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि १८ तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER