एनडीटीव्हीला आयकर खात्याने बजावलेली नोटीस सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्द

नवी दिल्ली : आयकरात उत्पन्न लपण्याबाबत आयकर खात्याने एनडीटीव्हीला बजावलेली नोटीस सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली. आयकर खात्याने आक्षेप घेतला होता की, २००७ – ०८ मधील उत्पनाच्या विवरणात एनडीटीव्हीने, तिच्या इंग्लंडमधीत सहकंपनीच्या ४०५.०९ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रकमेची माहिती लपवली होती. म्हणून, एनडीटीव्हीच्या २००७ – ०८ मधील आयकराच्या विवरणाचे पुरावलोकन करावे. ही नोटीस २०१५ ला बजावण्यात आली होती.

ही नोटीस रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एनडीटीव्हीने माहिती लपवल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही.