शाहीनबाग प्रदर्शनावर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय ; सार्वजनीक ठिकाण अनिश्चित काळासाठी अडवून ठेवू शकत नाही

Supreme Court-Shahinbagh protest.jpg

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीनबाग (Shahinbagh) येथे सीएए विरुद्ध (CAA) प्रदर्शनाच्या नावावर रस्ता रोखून ठेवणे याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चुकीचे ठरवले आहे. शाहीनबाग येथे सीएए विरुद्ध गेले अनेक महिने आंदोलन सुरू होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी आंदोलन करणा-यांना फटकारले आहे.

कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी असे अनिश्चित काळापर्यंत आंदोलन करता येणार नाही. अनिश्चित काळासाठी सार्वजनीक ठिकाण जप्त करून ठेवणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने म्हटले आहे की, या प्रकरणात प्रशासनाने वेळीच कारवाई करायला हवी होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून झाली नाही.

यासोबतच कोर्टाने असेही म्हटले आहे की, भविष्यात आता अशाप्रकारचे सार्वजनीक ठिकाण आंदोलनाच्या नावावर अडवून ठेवता येणार नाही.

सार्वजनीक ठिकाणी अनिश्चित काळासाठी कब्जा करता येणार नाही मग ते शाबहीनबाग असो वा कोणतेही सार्वजनीक ठिकाण. एवढेच काय तर, कोर्टाने असेही म्हटले आहे की, संविधानात विरोध करण्याचा अधिकार आहे तर, एखादी चुकीची गोष्ट घडू नये यासाठी आवाहन करण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा असे कोणतेही सार्वजनीक ठिकाण कोणी आंदोलनाच्या नावावर अडवून ठेवणार नाही याची खबरदारी घ्यावी असे कोर्टाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER