ऑक्सिजन आणि औषध पुरवठ्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; टास्क फोर्सची स्थापना

Supreme Court - Oxygen - Maharashtra Today

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. एकूण १२ सदस्यांत वेगवेगळ्या मेडिकल संस्थांवरचे तज्ज्ञ, आरोग्य मंत्रालयातल्या सचिवांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश असणार आहे.

देशातील ऑक्सिजनच्या वितरणासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्समधील सदस्य

१. डॉक्टर भबतोष विश्वास, कोलकाता येथील पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू
२. डॉक्टर देवेंद्र सिंह राणा, अध्यक्ष, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली
३. डॉ. देवीप्रसाद शेट्टी, चेअरपर्सन आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बेंगलुरू
४. डॉक्टर गगनदीप कांग, प्रोफेसर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
५. डॉक्टर जे. व्ही. पीटर, संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
६. डॉक्टर नरेश त्रेहान व व्यवस्थापकीय संचालक, मेदांता रुग्णालय व हृदय संस्था गुरुग्राम
७. डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल केअर मेडिसिन आणि आयसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड (मुंबई) आणि कल्याण (महाराष्ट्र)
८. डॉक्टर सौमित्र रावत, अध्यक्ष आणि प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली
९. डॉक्टर शिवकुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, डायरेक्टर, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्स (ILBS), दिल्ली
१०. डॉक्टर झरीर एफ. उदवाडिया, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारशी जनरल हॉस्पिटल, मुंबई
११. सचिव, भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दरम्यान, राष्ट्रीय टास्क फोर्सचे संयोजकदेखील टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत. यात केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्याचाही समावेश असेल. गरज पडल्यास कॅबिनेट सचिवाच्या सहकारी अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली जाऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button