सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा : शरद पवार

Supreme Court-Sharad Pawar

दिल्ली :- केंद्राच्या कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : शरद पवार अशोक चव्हाण यांची दिल्लीत भेट, मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे, असे म्हणालेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये रचनात्मक संवाद सुरू होईल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली. चर्चेत शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवले जाईल, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER