‘INS VIRAAT’ तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

INS Viraat - Supreme Court

दिल्ली : जगातील सर्वाधिक काळ सेवा दिलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेली नौका ‘आयएनएस विराट’संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो म्हणजे, या युद्धनौकेला तोडून भंगारात विकणे. या युद्धनौकेने भारतीय नौदलात ३० वर्षे सेवा केली. न्यायालयाने ‘आयएनएस विराट’ (INS Viraat) संदर्भात स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांच्या अध्यक्षतेखाली ए.एस.बोपण्णा व व्ही. रा

मसुब्रमण्यम यांच्यासह तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय घेतला. ८० च्या दशकात भारतीय नौदलाने ६५ दशलक्ष डॉलर्सला ही युद्धनौका घेतली होती. ती १२ मे १९८७ ला भारतीय नौदलात सामील करण्यात आली. ‘आयएनएस विराट’ विमानवाहू जहाजाचे भाग तोडण्याचा निर्णय जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने सरकारने घेतला होता.

या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ‘एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रा. लि. कंपनी’ने यासंदर्भात याचिकादेखील दाखल केली होती. ‘आयएनएस विराट’ हे जगातील सर्वांत प्रदीर्घ युद्धनौका आहे. ही युद्धनौका सेंटॉर वर्गातील दुसरी होती. या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता. केंद्राच्या म्हणण्यानुसार, जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने युद्धनौका तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१४ मध्ये तोडण्यात आलेल्या ‘आयएनएस विक्रांत’नंतरची ही दुसरी युद्धनौका आहे. ‘मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’तर्फे करण्यात आलेल्या लिलावात श्री राम समूहाने ३८.५४ कोटी रुपयाला ‘आयएनएस विराट’ विकत घेतले होते.

‘INS VIRAAT’ला इतके महत्त्व का?
१९८२ मध्ये अर्जेंटिना विरुद्धचे फॉकलंड युद्ध रॉयल ब्रिटिश नौदलाने जिंकले होते. त्यावेळी ही विमानवाहू युद्धनौका वापरण्यात आली. तिचे वजन २७,८०० टन आहे. या युद्धनौकेने ब्रिटनच्या नौदलात सेवा केली. १९५९ ते १९८४ च्या काळात ‘एचएमएस हर्मीस’ नावाने ती ओळखली जात होती. नंतर या युद्धनौकेची दुरुस्ती करून ती भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER