अजितदादांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; भाजपचे दिग्गज नेते मोहिते पाटील यांचे समर्थक गळाला

पंढरपूर :- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (Mangalvedha-Pandharpur Assembly constituency) होणाऱ्या पोटनिडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपच्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. अजित पवार पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दोन दिवसांत अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. अजित पवारांनी स्वत: या निवडणूक प्रचारात उतरून भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी पहिल्या दिवशी कल्याण काळे आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर आज भाजपला आणखी एक धक्का दिला.

पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि परिचारक गटाचे बांधकाम सभापती नगरसेवक सुरेश नेहतराव यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवेढा येथील हुलजंती येथे होणाऱ्या सभेत ते आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) निवडणूक राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची केली आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मूळ राष्ट्रवादीसाठी साधी सोपी वाटणारी लढत परिचारक आणि अवताडे गट एकत्रित आल्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. यासाठी सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विशेष लक्ष दिले. मात्र भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची चाचपणी करत असताना कट्टर वैरी असणारे मोहिते-पाटील आणि परिचारक यांना एकत्र आणून समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान निर्माण केले. अजित पवारांनी पंढरपुरात अनेक भेटीगाठी घेतल्या. शहरातील राजकीय घराणी असणाऱ्या धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांची भेट घेत धनगर समाजाला पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला. तर पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका न घेणाऱ्या मनसे राज्य समन्वयक दिलीप धोत्रे यांच्याकडे भोजनाला जाऊन राष्ट्रवादीला मदत करण्याचे आवाहन केले.

ही बातमी पण वाचा : अजितदादांचा राजू शेट्टींना मोठा धक्का, स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button