‘विद्युत बिल घोटाळा” याचिकेला समर्थन द्या ; किरीट सोमय्यांचे आवाहन

Kirit Somaiya - Electricity Bill Ghotala

मुंबई : राज्य सरकार व महावितरणच्या (MSEDCL) विरुद्ध एमईआरसी (MERC) येथे आमच्या “विद्युत बिल घोटाळा” याचिकेला समर्थन द्या असे आवाहन भाजप (BJP) नेते व माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केले आहे . यासंदर्भात त्यांनी एक लिंकही शेयर केली आहे . या याचिकेची सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे .

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तीन महिने वीज मीटर रीडिंग घेण्यात आले नव्हते. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि जुलै महिन्यात ग्राहकांच्या हाती तीन महिन्यांचं एकत्रित वीजबिल पडलं. या बिलांवरील भरमसाठ रकमा पाहून राज्यातील सामान्य वीजग्राहक हादरले आहेत. या बिलांवरून बरंच वादळ उठलं असताना व सरकार स्तरावर तोडगा काढण्यासाठी बैठका होत असतानाच या प्रश्नी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते .

Electricity Bill Ghotala

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER