शेतकरी आंदोलनाला परदेशातूनही समर्थन

pm modi & Farmers

नवी दिल्ली :  दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाची चर्चा आता परदेशातही होत आहे. या आंदोलनावर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग (Rihanna and Greta Thunberg) यांच्यासह अनेक परदेशी सेलिब्रिटी आणि नामवंत मंडळींकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातील काही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या शांतिपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आहेत. तसेच मीडियावर हॅशटॅगचा ट्रेन्डही दिसून आला. याचा मात्र सरकारला चांगलाच झटका बसला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांबाबत मोदी सरकारने (Modi Govt) यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे आंदोलन छोट्या भागांशी संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे, असा दावा प्रतिक्रियेत केला आहे. हा प्रकार, ‘सनसनी फैलावणारे सोशल मीडिया हॅशटॅग’ आणि ‘कमेंटसची हाव’ असल्याने सरकारने आंतरराष्ट्रीय नेटकऱ्यांना इशारा दिला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रतिक्रियेत  #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda असे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. ‘भारताचे लोकशाही मूल्य, सरकार तसेच संबंधित शेतकरी संघटनांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या आंदोलनाला बघायला जायला हवं.’ असेही सरकारने म्हटले आहे. ‘कोणत्याही विषयांवर भाष्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी, संपूर्ण प्रकरण समजून घ्यायला हवे. हॅशटॅग आणि टिप्पण्यांवरून आपले मत बनवणे, विशेषत: सेलिब्रिटींकडून चुकीचंच नाही तर बेजबाबदार आहे’ असेही म्हटले आहे.

कायद्यांना संमती

‘सखोल चर्चा आणि विश्लेषणानंतर कृषी कायद्यांना मान्यता देण्यात आली. ज्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत प्रवेश देऊन, शेतीला अधिक लवचीक बनवण्याचे काम करतात. हे कायदे आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वत शेतीसाठी मार्ग दाखवणार आहेत.’ असे निवेदन सरकारकडून करण्यात आले आहे. उल्लेखनीय, माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला उत्तर देताना कृषी कायद्यांसंबंधी झालेली चर्चा, पत्रव्यवहार, फाईल, रेकॉर्डसंबंधी कोणतीही माहिती देण्यास तसेच कृषी कायद्यांविषयी दस्तऐवज सार्वजनिक करण्यास केंद्राकडून नकार देण्यात आला होता.

ही बातमी पण वाचा : ..तर ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरु, राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER