सुपरस्टार रजनीकांत यांना अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज

Superstar Rajinikanth .jpg

हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रूग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांना कोणती गंभीर समस्या नाही. रजनीकांत यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले आहे, ‘रजनीकांत यांना २५ डिसेंबर रोजी उच्च रक्तदाब आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत. आता त्यांचे रक्तदाब स्थिर आहे आणि त्यांना आता बरे वाटत आहे. त्यांची प्रकृती पाहता त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे.

रजनीकांत यांची प्रकृती २५ डिसेंबर रोजी बिघडली होती. ते त्यांचा आगामी चित्रपट ‘Annaatthe’चे शूटिंग करत होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने हैदराबादमधील जुबली हिल्स, अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER