सुपरनायिका कॅटरीनला नायक नाही

Katrina Kaif

प्रख्यात दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) भारतीय सुपरहीरोंवर तीन चित्रपट तयार करणार आहे. यापैकी एका चित्रपटात कॅटरीना कैफ (Katrina Kaif) सुपरनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचे डोळे चित्रपटातील नायकाकडे लागले होते. या सुपरनायिका चित्रपटात कॅटरीनाचा नायक कोण असे याचे अनेक कयास बांधण्यात आले होते. परंतु आता असे समजते की, या चित्रपटात कॅटरीनाला नायकच नसेल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अली अब्बास जफरने जेव्हा चित्रपटाच्या कथेवर काम सुरु केले तेव्हा त्याला जाणवले की, या चित्रपटात नायकाला जागाच नाही. नायिकाच सगळे काम करीत असल्याने नायक नसला तरी चालण्यासारखे आहे. त्यामुळे उगाचच नायक घुसवून नायक-नायिकेचे प्रेम दाखवण्याचा बदल कथेत न करण्याचा निर्णय अली अब्बासने घेतला.

हा अत्यंत खर्चिक आणि भव्य चित्रपट असणार आहे. याचे शूटिंग पोलंड, जॉर्जिया, दुबई, अबू धाबी आणि हिमाचल, उत्तराखंडमध्ये केले जाणार आहे. अली ने सांगितले, आम्ही दुबई आणि अबू धाबीमधील लोकेशन फायनल केले असून लवकरच मी पोलंड आणि जॉर्जियाला जाणार असून तेथेही लोकेशन फायनल करणार आहे. या चित्रपटानंतर मी मिस्टर इंडिया चित्रपट सुरु करणार असल्याची माहितीही त्याने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER