२६ मे रोजी ‘सुपर लूनर इव्हेन्ट’; चंद्र दिसेल लाल!

Lunar eclipse

या वर्षाचे पहिले खग्रास (पूर्ण) चंद्रग्रहण २६ मे रोजी आहे. या ग्रहणाच्या वेळी बरेच दुर्लभ योग आहेत. या दिवशी ‘सुपरमून’ असेल. तो रक्तिम लाल (Blood Red) दिसेल. हा योग बऱ्याच वर्षांनंतर येतो. याला ‘सुपर लूनर इव्हेन्ट’ म्हणतात. कारण या दिवशी सुपरमून आणि ग्रहण या दोन्ही स्थिती असतील.

सुपरमून चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी तो नेहमीपेक्षा १२ टक्के मोठा दिसतो. चंद्र पृथ्वीपासून ४,०६,३०० किलोमीटर दूर आहे. सुपरमूनच्या वेळी हे अंतर कमी होऊन ३,५६,७०० किलोमीटर राहते, त्यामुळे चंद्र मोठा दिसतो; म्हणून त्याला सुपरमून म्हणतात.

चंद्र पृथ्वीच्या कक्षेत, पृथ्वीच्या भोवती अंडाकार प्रदक्षिणा करत असतो त्यामुळे एका स्थतीत तो पृथ्वीच्या जवळ येतो. त्यावेळी त्याची चमक वाढते.

पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राला ग्रहण लागते. चंद्र त्याच्या कक्षेत ५ डिग्री झुकला आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या थोडा वर किंवा खाली असतो. पण, वर्षातून दोन वेळा अशी स्थिती निर्माण होते की, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात. त्यावेळी खग्रास (पूर्ण) चंद्र ग्रहण लागते.

चंद्र लाल का दिसेल?
पृथ्वीच्या वातावरणातील गॅसमुळे आपल्याला आकाश निळ्या रंगाचे दिसते. पण लाल रंगाचे किरण त्याच्या पार निघतात. याला रेलिंग स्कैटरिंग (Rayleigh Scattering) म्हणतात. यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त लाल दिसतात. चंद्र ग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वायुमंडळातून लाल किरण निघतात. हवेमुळे त्यांची दिशा बदलते आणि ते चंद्राकडे वळतात. तिथे निळा रंग फिल्टर होतो त्यामुळे चंद्र लाल दिसतो.

कुठे दिसणार
हे ग्रहण प्रशांत महासागराच्या मध्य रेषेत ऑस्ट्रेलिया, आशियाच्या पूर्वी आणि अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर दिसेल. सुरुवातीला थोडा वेळ ते अमेरिकेच्या पूर्वेला अर्ध्या भागात दिसेल.

भारतात २६ मे रोजी दुपारी २. १७ वाजेपासून सायंकाळी ७. ०७ पर्यंत ग्रहण दिसेल. ते भारताच्या पश्चिम भागात सोडून अन्यत्र दिसेल. ग्रहणाच्या खग्रास स्थितीत चंद्र लाल दिसेल. यानंतर सुपरमून १८ आणि १९ नोव्हेंबरला दिसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button