‘सुपर हॕप्पी’ सक्कारीने खंडीत केली ओसाकाच्या विजयांची मालिका

naomi osaka - Maria Sakkari - Maharastra Today
naomi osaka - Maria Sakkari - Maharastra Today

जगातील नंबर दोनवरील जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) ही आपल्या सलग 23 विजयांची मालिका कुठवर वाढवते अशी चर्चा सुरू असताना तिला पराभवाचा धक्का बसला. ग्रीसच्या (Greece) मारिया सक्कारी (Maria Sakkari) हिने तिला 6-0, 6-4 अशी मात देत मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सक्कारीचा सामना आता कॕनडाच्या बियांका आंद्रेस्कू हिच्याशी होईल.

नाओमी ओसाकाचा गेल्या 14 महिन्यांतील हा पहिलाच पराभव होता. अनपेक्षित निकालाच्या या सामन्या सक्कारीने पहिल्या सेटमध्ये ओसाकाला फक्त आठच गूण घेऊ देत 6-0 असा सेट जिंकत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यानंतर ओसाकाने दुसऱ्या सेटमध्ये 4-1 अशी आघाडी घेतल्यावर वाटले होते की ती आपला सलग 24 वा विजयसुध्दा नोंदवेल पण 25 वर्षीय सक्कारीने 1-4 अशा पिछाडीवरुनही पुढचे सलग पाच गेम जिंकले आणि यंदाचा सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला. आपल्या हार न मानण्याच्या वृत्तीचा परिचय सक्कारीने आदल्या सामन्यातही दिला होता. चौथ्या फेरीत जेसिका पेगूलाविरुध्द तब्बल सहा मॕचपाॕईंट वाचवत तिने बाजी मारली होती. त्यानंतर आता ओसाकाला मात देत ती पहिल्यांदाच मायामी ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

क्रमवारीत 23 व्या स्थानी असलेल्या सक्कारीने कारकिर्दीत प्रथमच टॉप तीनमधल्या खैळाडूवर विजय नोंदवला. या यशाने आपण ‘सुपर हॕप्पी’ आहोत असे तिने सामन्यानंतर सांगितले. आदल्या सामन्यात जेसिका पेगुलाविरुध्द आपण सहा मॕचपाॕईंट वाचवत जो संघर्षमय विजय मिळवला त्याची ओसाकाविरुध्द मोठी मदत झाली. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पिछाडीवरुन बाजी मारली. बहुतेक ‘कमबॕक’ हा माझा ट्रेडमार्कच झाला आहे असे सक्कारी म्हणाली.

या पराभवाने नाओमी ओसाकाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. आता सर्वोच्च स्थानी आॕस्ट्रेलियाची अॕशली बार्टी हीच कायम राहील अशी स्थिती आहे.

पुरुषांमध्ये अग्रमानांकित रशियन दानिल मेद्वेदेव यालासुध्दा पराभवाचा धक्का बसला. त्याला राॕबर्ट बौटिस्टा अगट याने 6-4, 6-2 अशी मात दिली आणि चौथ्यांदा एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button