IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद १० गड्यांनी विजयी होऊन प्लेऑफमध्ये

Sunrisers Hyderabad won by 10 wickets

शारजा येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग-२०२० च्या ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईने निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून १४९ धावा केल्या.

मुंबईकडून कीरोन पोलार्डने २५ चेंडूंत  ४१ धावा केल्या. त्याशिवाय क्विंटन डिकॉकने २५, सूर्यकुमार यादवने ३६ आणि ईशान किशननेही ३३ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर हैदराबादकडून संदीप शर्माने त्याच्या चार षटकांत ३४ धावा देऊन तीन गडी बाद केले, त जेसन होल्डर आणि शाहबाज नदीमने दोन  आणि राशिद खानने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १७.१ षटकांत १५० धावांचे लक्ष्य गाठले आणि १० गड्यांनी विजय मिळवला. हैदराबादकडून डेविड वॉर्नरने ५८ चेंडूंत ८५ धावा आणि रिद्धिमान साहाने ४५ चेंडूंत  ५८ धाव केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER