ओळखलं का या मेकअपविना असलेल्या नायिकेला

Sunny Leone without makeup.jpg

पडद्यावर नायिका अत्यंत सुंदर दिसतात. त्यांचे सौंदर्य पाहून अनेक मुली, महिला त्यांच्याप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न करू लागतात. पण त्यात त्यांना यश येतेच असे नाही. नायिका सतत चेहऱ्यावर मेकअपचा थर लावून वावरत असतात. त्यामुळे त्या प्रत्येक वेळी सुंदरच दिसतात. त्यांच्या सुंदरतेची, केसांची, त्वचेची काळजी घेण्यासाठी एक मोठी टीम असते आणि त्यामुळेच त्या सुंदर दिसत असतात. पण या नायिकांनी मेकअप केला नाही आणि मेकअपविना बाजारात फिरू लागल्या तर त्यांना कोणीही ओळखणार नाही. कधी काळची पोर्न स्टार आणि सध्या बॉलिवुडमध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेल्या सनी लिओनीचा मेकअपविना एक फोटो व्हायरल झाला असून तो फोटो पाहून ही नक्की सनी लिओनी (Sunny Leone) आहे का असा प्रश्न करालच यात शंका नाही.

सनी लियोनीची वेगळी इमेज असल्याने ती नेहमी अत्यंत उत्कृष्ट मेकअप, डोळ्यांचा मेकअप आणि ग्लॉसी लुकमध्येच दिसते. ती तिच्या परफेक्ट लुकचे रहस्य हा मेकअप आहे असे नेहमी सांगत असते. त्यामुळे ती कधीही मेकअपविना बाहेर पडत नाही. मात्र नुकताच तिचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला असून यात ती मेकअपविना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर ती सनी लिओनी असेल यावर विश्वासच बसत नाही. सनीचा हा मेकअपविना आणि नंतर मेकअप असलेला फोटो पाहिला की मेकअपने काय करामात करता येऊ शकते ते स्पष्टपणे दिसते.

केवळ सनीच नाही तर बॉलिवुडमधील अनेक नायिका मेकअपविना ओळखताच येणार नाही अशा असतात. केवळ मेकअपमुळेच त्या सतत सुंदर दिसतात. हे सनीच्या या फोटोमुळे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER