
कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) उठल्यानंतर बॉलिवुड मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेले आहे. अपूर्णावस्थेतील सिनेमाचे शूटिंग करण्याबरोबरच तयार झालेल्या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे कामही सुरु करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर नवीन सिनेमाचे मुहुर्त होऊन त्याच्या शूटिंगलाही प्रारंभ केला जाऊ लागला आहे. हॉलिवुडमधील पोर्न स्टार सनी लियोनीने (Sunny Leone) बॉलिवुडमध्ये येऊन चांगलेच यश मिळवले होते. महेश भट्ट यांनी सनी लियोनीला बॉलिवुडमध्ये आणले होते. सनी लियोनीने तिच्या नव्या सिनेमाचे शूटिंग सुरु केले असून याचे दिग्दर्शन विक्रम भट्ट करीत आहे. सनी आणि विक्रम प्रथमच एकत्र काम करीत आहेत. स्वतः सनीनेच सोशल मीडियावर शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
कोरोनाची लागण झाल्यानंतर सनी लियोनी दत्तक घेतलेल्या मुलींसोबत लॉस एंजिलिसला गेली होती. सनी लियोनी गेल्या वर्षी आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी अभिनीत ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमात दिसली होती. काही दिवसांपूर्वीच सनी पुन्हा मुंबईला परतली.
सनी लियोनीने सोमवारी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती ‘अनामिका’च्या सेटवर हातात क्लिपबोर्ड घेऊन असलेली दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत ती दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत हातात क्लिपबोर्ड घेऊन उभी असलेली दिसत आहे. या फोटोंसोबत सनीने लिहिले आहे, ‘सतनाम… एका नव्या कामाची सुरुवात होत आहे आणि माझा लॉकडाउन संपत आहे. विक्रम भट्टसोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात करीत आहे.
कोरोनानंतरचा सनीचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे ज्याचे शूटिंग सुरु झाले आहे. मात्र हकोरोना वायरस को लेकर देश में लागू किए गए लॉकडाउन के बाद यह सनी लियोनी का ‘अनामिका’ सिनेमा आहे की वेब सीरीज याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला