श्रृती हसनच्या पित्याची भूमिका साकारणार सनी देओल

Maharashtra Toaday

अनलॉकनंतर बॉलिवूडने पुन्हा मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली होती. नव्या सिनेमांची घोषणा करण्यापासून ते रिलीजची तारीख घोषित करण्यापर्यंतची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी बॉलिवूडने काम कमी केले नसून आणखी वेगाने सुरु केले आहे. अमिताभच्या (Amitabh Bachchan) नव्या सिनेमाच्या मुहुर्ताची आणि तो आजपासून काम सुरु करणार असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होतीच. सनी देओलचा (Sunny Deol) लहान मुलगा राजवीर (Rajveer Deol) सिनेमात येत असल्याची बातमीही आम्ही तुम्हाला दिली. आता आणखी एक बातमी म्हणजे सनी देओलने श्रृती हसनच्या (Shruti Hasan) वडिलांची भूमिका साकारण्यास होकार दिला (Sunny Deol will play the role of Shruti Hassan’s father)असून त्याचा हा नवा सिनेमा लवकरच सेटवर जाणार आहे.

बॉलिवूडमध्ये पन्नाशी पारचे सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार त्यांच्यापेक्षा वयाने लहान मुलींसोबत नायक म्हणून काम करीत आहेत. सनी देओलही नायक म्हणून काम करीत आला आहे. पण आता त्याने वेगळ्या भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला असून प्रथमच एका मोठ्या नायिकेचा म्हणजेच श्रृती हसनच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक आर. बाल्की (R. Balki) एक नवीन कौटुंबिक सिनेमा तयार करीत असून त्यात सनी देओल या रुपात दिसणार आहे. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय कुटुंबाची ही कथा असून आई-वडिल आणि त्यांची एकुलती एक मुलगी यांच्याभोवती फिरणारी ही कथा असल्याचे सांगितले जात आहे. सनी देओलला त्याची भूमिका प्रचंड आवडल्यानेच त्याने होकार दिल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूडमध्ये नायिाक म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारण्याची सनी देओलची ही पहिलीच वेळ आहे.

आर. बाल्की सध्या साऊथ स्टार दुलकीर सलमानसोबतच्या (Dulquer Salman) कामात व्यस्त आहे. दुलकीर हा प्रख्यात स्टार ममूटीचा लहान मुलगा असून त्याने बॉलिवूडमध्येही सोनम कपूरसोबत एंट्री केलेली आहे. दुलकीरसोबतचा सिनेमा पूर्ण झाल्यानंतर आर. बाल्की सनी देओसोबतच्या या सिनेमाला सुरुवात करणार आहे. अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जाणारा सनी या सिनेमात प्रथमच इमोशनल भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button