आंधळ्या आर्मी ऑफिसरची भूमिकार साकारणार सनी देओल

Sunny Deol

भाजप (BJP) खासदार सनी देओल (Sunny Deol) स्वतःची निर्मिती असलेल्या सिनेमाचे काम सुरु करणार असून आता त्याने अन्य निर्मात्यांच्या सिनेमाचे शूटिंग करण्यासही होकार दिला आहे. सनी देओलने गेल्या वर्षी ‘द ब्लाइंड केस’ सिनेमा साईन केला होता जो या वर्षीच प्रदर्शित करण्याची योजना होती. परंतु कोरोनामुळे (Corona) शूटिंगच बंद असल्याने या सिनेमाचे शूटिंग होऊ शकले नव्हते. मात्र आता सनीने या सिनेमाचे शूटिंग करण्यास होकार दिला असून पुढील महिन्यात याचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. पुढील वर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.

सनीचा हा सिनेमा अॅक्शन थ्रिलर असून सिनेमा साईन केला तेव्हा, हा एक अत्यंत वेगळा आणि जोरदार विषय आहे ज्यात सस्पेंसचा तडकाही आहे. अशी भूमिका मी आजवर साकारलेली नाही असे सनीने सांगितले होते.

या सिनेमात सनी एका निवृत्त झालेल्या एका आंधळ्या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारीत आहे. कमी दिसत असतानाही सनी एका बदमाशाविरोधात लढणाऱ्या चार तरुणांना कशी मदत करतो ते या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन साऊथचा यशस्वी दिग्दर्शक हनु राघवपुडी करीत आहे. विशेष म्हणजे ‘द ब्लाइंड केस’ हा कोणत्याही साऊथच्या सिनेमाचा रिमेक नसून अत्यंत फ्रेश कथेवर आधारित सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER