सनी देओलच्या डोक्यावर आहे इतक्या कोटींचे कर्ज

Sunny Deol

1983 मध्ये सनी देओलने (Sunny Deol) बॉलिवूडमध्ये बेताब सिनेमातून एंट्री केली होती. या सिनेमात त्याची नायिका होती अमृता सिंह. अमृताचाही हा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर सनीने बॉलिवूडवर (Bollywood news) राज्य केले होते. त्याचे अनेक सिनेमे हिट झाले. त्याच्या भूमिकांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. अभिनय करता-करताच सनीने निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यासही सुरुवात केली. आता तर त्याने स्वतःच्या मुलाला करणलाही बॉलिवूडमध्ये लाँच केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवून तो आता संसदेतही पोहोचला आहे. सनीला बॉलिवूडमध्ये येऊन आता 38-39 वर्षे झाली आहेत. मात्र तरीही तो कर्जाच्या विळख्यात आहे.

आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपये कमवले असतील मग त्याला कर्ज घेण्याची गरज काय? तुमच्या मनात आलेली ही शंका बरोबरही आहे. पण स्वतः सनीनेच निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उत्पन्नाचे जे शपथपत्र दिले आहे त्यात त्याने त्याच्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यात थोडेथोडके नव्हे तर चक्क 53 कोटी रुपयांचे कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. एवढेच नव्हे तर 1 कोटी रुपयांचा जीएसटीही त्याने भरलेला नाही. सनीच्या शपथपत्रानुसार तो 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या घरात राहात आहे. त्याच्याकडे एकूण 83 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यापैकी 60 कोटी रुपयांची चल आणि 21 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. सनीच्या बँक खात्यात 9 लाख रुपये असून 26 लाखांची कँश त्याच्याकडे आहे. त्याची पत्नी पूजा 6 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्या बँक अकाउंटमध्ये 19 लाख आणि तिच्याकडे 16 लाख कँश आहे. या दोघांनी 51 कोटी रुपयांचे कर्ज एका बँकेकडून घेतले असून 2.5 कोटी रुपये सरकारी कर्जही आहे.

सनीकडे 1.69 कोटीच्या गाड्या आणि 1.56 कोटींची ज्वेलरी असून 21 कोटी रुपये किंमत असलेली जमीनही आहे. अर्थात गेल्या दोन-अडीच वर्षात सनीच्या संपत्तीत वाढ झालीच असेल पण त्याचे कर्ज कमी झाले की नाही त्याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही. सनीच्या तुलनेत सावत्र आई हेमा मालिनी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. हेमा मालिनीची एकूण संपत्ती 249 कोटी रुपये असून यापैकी 114 कोटी रुपयांची संपत्ती हेमाची तर 135 कोटी रुपयांची संपत्ती पति धर्मेंद्रची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER