प्रा.सुनील मगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Sunil Magare enter in NCP

औरंगाबाद : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड रिसर्च असोसिएशनचे (मुप्टा) संस्थापक सचिव तथा माजी नगरसेवक प्रा.सुनील मगरे यांनी आज (दि.२४) मुंबई येथे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक विभाग मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आदींची उपस्थिती होती.

खा.शरद पवार यांच्या विचारांमुळे प्रभावीत होवून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रा.सुनील मगरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पासून दुरावलेल्या दलित समाजाला जवळ आणण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रा.सुनील मगरे यांनी प्रवेशानंतर सांगितले.

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील मगरे हे मागील २५ वर्षांपासून आंबेडकरी चळवळ तसेच शैक्षणिक चळवळीमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदी ते निवडून आलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी झालेल्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रीय सहभाग होता. भारिप बहूजन महासंघाच्यातवीने २००३ मध्ये झालेल्या औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. २० वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेजड्‌ रिसर्च असोसिएशनची (मुप्टा) स्थापना केली. संस्थापक सचिव म्हणून त्यांनी या संघटनेच्यामाध्यमातून शिक्षकांवर होणार्‍या अन्यायाविरोधात आक्रमक आंदोलने केली. सध्या ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणीत रिपब्लिकन स्टुडंस्‌ फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

शिवसेनेचे खंदे समर्थक बापू गुरव यांचा भाजपमध्ये प्रवेश; शिवसेनेला धक्का