धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपने स्वतःकडे बघावं – सुनिल केदार

Sunil Kedar

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका रेणु शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केल्यानंतर भाजपकडून मुंडेंचा राजीनामा घेण्याची आक्रमक मागणी होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडून मुंडेंना तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी भाजपलाच सुनावले आहे.

धनजंय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने स्व:तकडे बघावं. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केलेलं वक्तव्यही त्यांनी बघावं,” असा टोला सुनिल केदार यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी सुरु आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. असे सांगिण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांचा धनंजय मुंडेंना दिलासा, तुर्तास राजीनामा न घेण्याचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER