सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

Sunil kedar

नागपूर : पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची कोरोना (Corona) चाचणी गुरुवारी पॉझिटिव्ह आली. उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहे. केदार मंगळवारी नागपुरात होते. जिल्ह्यातील पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर ते मुंबईला गेलेत.

गुरुवारी सकाळी त्यांना ताप चढला, अस्वस्थ वाटू लागले. तपासणीसाठी ते दुपारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले, कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. ते तेथेच उपचारासाठी भरती झालेत. सायंकाळी आरटीपीसीआर चाचणीसाठी नमूने घेण्यात आले. त्याचा अहवाल शुक्रवारी येईल. केदार यांच्या नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER